'बेस्ट'कडून सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी, शंभर टक्के वाहक-चालकांची उपस्थिती

 इतर वाहक, चालक हे बस डेपोमध्येच थांबून असल्याचे पाहायला मिळाले.

Updated: Mar 27, 2020, 08:21 AM IST
'बेस्ट'कडून सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी, शंभर टक्के वाहक-चालकांची उपस्थिती title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लॉकडाऊनच्या काळात सगळीकडे संचारबंदी असताना ठराविक बसेस रस्त्यांवरुन धावताना दिसत आहेत. असे असताना बेस्ट प्रशासनाने सर्व चालक आणि वाहकांना कामावर बोलावले आहे. एकमेकांच्या संपर्कात न येण्यासाठी प्रत्येकाने घरी बसण्याचे आवाहन एकीकडे केले जात असताना काम नसतान कर्मचाऱ्यांना बोलावून बेस्टकडून सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी झालेली पाहायला मिळत आहे. 

साधारण ३० टक्के बेस्ट बसेस रस्त्यावर धावत असताना इतर वाहक, चालक हे बस डेपोमध्येच थांबून असल्याचे पाहायला मिळाले. ३० टक्के कर्मचारी काम करत आहेत. मात्र उरलेल्या ७० टक्के कर्मचाऱ्यांना डेपोमध्ये बसवून ठेवलं जातंय. त्यामुळे डेपोत दिवसभर बस वाहक, चालकांची गर्दी पाहायला मिळतेय. माणसांनी एकमेकांशी कमीत कमी संपर्क ठेवावा, जेणेकरुन कोरोना पसरणार नाही यासाठी सोशल डिस्टंसिंगचे आवाहन करण्यात येत आहे. पण इथे त्याविरुद्ध चित्र पाहायला मिळाले. 

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या वाहतुकीसाठी बेस्ट बसेस सुरु आहेत. बऱ्याच ठिकाणी गरज नसताना जास्त गाड्या सोडल्या जातायत. झी २४ तासने यासंदर्भातील वृत्त समोर आणले होते. त्यानंतर बेस्टनं मिनी एसी बस बंद केल्या आहेत. तरीही काल सव्वा तीन हजार बसपैकी १७०० बसेस रस्त्यावर असल्याचे दिसून आले.