मुंबईच्या रेडझोनमधील कोरोना रूग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ

 मुंबईत सध्या रूग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग १२ दिवसांवर

Updated: May 26, 2020, 09:20 PM IST
मुंबईच्या रेडझोनमधील कोरोना रूग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ title=

कृष्णात पाटील, मुंबई : मुंबईच्या रेडझोनमधील कोरोना रूग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत आहे. मुंबईत सध्या रूग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग १२ दिवसांवर आला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून मुंबईत ही संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रशासनासह मुंबईकरांच्या चिंता ही वाढल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेचे 5 वॉर्ड असे आहेत ज्यात 2 हजाराहून अधिक रुग्ण आहे. 

मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या धारावीत आजा कोरोनाच्या ३८ रूग्णांची वाढ झाली आहे. धारावीत एकूण रुग्णांची संख्या १६२१ वर पोहोचली आहे. दादरमध्ये आज ६ रूग्ण वाढले असून येथे एकूण रूग्णसंख्या २४५ वर पोहोचली आहे. तर माहिममध्ये २४ रूग्ण वाढले असून एकूण कोरोना रूग्णसंख्या ३७५ वर पोहोचली आहे.

टॉप 10 विभाग

१. मुंबईत सर्वाधिक २५९८ रूग्णसंख्या धारावी, दादर, माहिमचा भाग असलेल्या जी उत्तर वॉर्डमध्ये. इथं १७ दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट
२. भायखळा, मुंबई सेंट्रलचा भाग येणा-या ई विभागात २३३१ रूग्णसंख्या. इथंही १७ दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट
३. वडाळा,सायन, माटुंगा परिसर येणा-या एफ उत्तर विभागात २२९२ रूग्णसंख्या. इथंही १७ दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट
४. कुर्ल्याचा भाग येणा-या एल विभागात २१९७ रूग्ण. तर ११ दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट
५. बांद्रा पूर्व, सांताक्रूझचा भाग येणा-या एच पूर्व विभागात २००६ रूग्ण. इथं १२ दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट
६. अंधेरी पश्चिमचा के पश्चिम विभागात १९६८ रूग्ण. इथं १४ दिवसांत रूग्णसंख्या दुप्पट
७. वरळी, प्रभादेवीचा जी दक्षिण विभागात १८११ रूग्ण तर २० दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट
८. अंधेरी पूर्व,जोगेश्वरीचा भाग असलेल्या के पूर्व भागात १७४१ रूग्ण. इथं १० दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट
९. गोवंडी, मानखूर्दचा भाग येणा-या एम पूर्व विभागात १६२० रूग्णसंख्या. तर इथं १४ दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट
१०. परळचा भाग येणा-या एफ दक्षिण विभागात १५३० रूग्ण असून ९ दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट