राज्यात २२५ जणांना कोरोनाची लागण, आणखी पाच रुग्ण पॉझिटिव्ह

 महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता  २२५वर पोहोचला आहे.  

Updated: Mar 31, 2020, 10:25 AM IST
राज्यात २२५ जणांना कोरोनाची लागण, आणखी पाच रुग्ण पॉझिटिव्ह   title=

मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता  २२५वर पोहोचला आहे. मुंबई, पुणे आणि बुलढाण्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात १० जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. मृतांमध्ये मुंबईतील ८ जणांचा तर पुण्यात एकाचा आणि बुलढाण्यातील एकाचा समावेश आहे.  

कोरोनाच्या रुग्णांचा राज्यातला आकडा वाढतोय. आज कोरोनाचे मुंबई, पुणे आणि बुलढाण्यात काही रुग्ण आढळले, मुंबईत १, पुणे आणि बुलढाण्यात प्रत्येकी २ रुग्ण आढळले त्यामुळे आता राज्यातल्या रुग्णांची संख्या २२५ झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात १० जणांचा मृत्यू झालाय. 

बुलडाण्यातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर येते आहे.. मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णानंतर अजून दोन रुग्ण पॉझिटिव्ह जिल्ह्यात आढळले असून जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ही माहिती दिली. हाय रिस्क असलेल्या २४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्यात दोन रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सांगलीत परदेशवारी करून आलेल्या १३७८ नागरिकांपैकी १ हजार ६७ जणांना होम क्वॉरंटाईन केले आहे. सध्या मिरजेतील रुग्णालयात २५ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आला आहे.