कृष्णात पाटील, मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. या भागात फैलावणारा कोरोना रोखण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले असून रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला आहे.
मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण जी दक्षिण विभागात आहेत. कोरोनाचे तब्बल ३४ रुग्ण या विभागात सापडले आहेत. जी दक्षिण विभागात सापडलेल्या ३४ पैकी दोन रुग्णांचा मृत्युही झाला आहे.
जी दक्षिण विभागातील वरळी कोळीवाड्यात १० रुग्ण आहेत. याशिवाय प्रभादेवी, आदर्शनगर, लोअर परेल या भागातही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
जी दक्षिण विभागात ३४ रुग्ण सापडल्यानं हा भाह सर्वाधिक डेंजर झोन ठरला आहे. त्यामुळे वरळी कोळीवाडा पूर्ण सील करण्यात आला आहे. तसंच ज्या भागात रुग्ण सापडले आहेत, तो परिसरही सील करण्यात आला आहे.
दरम्यान, पर्यावरण आदित्य ठाकरे यांनीही व्हिडिओद्वारे वरळीतील जनतेला कोरोनाच्या लढ्यात साथ देण्याचं आवाहन केलं आहे. जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. पण हे युद्ध जिंकायचे आहे, असं ठाकरे यांनी जनतेला केलेल्या आवाहनात म्हटलं आहे.