आनंदाची बातमी: मुंबईत कोरोनाचा वेग मंदावला, डबलिंग रेट सुधारला

१ जूनला मुंबईतील कोरोनाचा डबलिंग रेट१८ दिवस इतका होता.

Updated: Jun 19, 2020, 07:06 PM IST
आनंदाची बातमी: मुंबईत कोरोनाचा वेग मंदावला, डबलिंग रेट सुधारला title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: देशभरातील कोरोना व्हायरसच्या Coroanavirus वाढत्या प्रादुर्भावामुळे सामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. तर मुंबई हा सध्या कोरोनाचा राज्यातील हॉटस्पॉट मानला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग मंदावल्याची माहिती समोर आली आहे. कारण, मुंबईतील कोरोनाचा डबलिंग रेट (रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी) हा ३३ दिवसांपर्यंत वाढला आहे. 

१ जूनला मुंबईतील कोरोनाचा डबलिंग रेट१८ दिवस, तर १० जूनला डबलिंग रेट २५ दिवस इतका होता. कालपर्यंत हा कालावधी ३० दिवस इतका झाला होता. यानंतर आज पुन्हा कोरोनाच्या डबलिंग रेटमध्ये वाढ झाली आहे. 
तर शहरातील रूग्णवाढीचा सरासरी  दरही आज 2.15% असून काल हा 2.30% होता. 1 जूनला हा सरासरी  दर 3.85% होता तर 10 जूनला 2.82% होता. 

मुंबईतील एच पूर्व वॉर्डने आज मोठी उडी घेतली असून त्यांचा रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 69 दिवसांवर पोहोचला असून रूग्ण वाढीचा सरासरी दर फक्त 1% असा सर्वात कमी आहे. ई विभागात हे प्रमाण 61 असून रूग्ण वाढीचा सरासरी दर 1.1%  तर  एफ उत्तर मध्ये  रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी  60 दिवस आणि रूग्ण वाढीचा सरासरी दर 1.2% आहे.

रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांपेक्षा जास्त असलेले विभाग. कंसातील आकडे सरासरी रूग्णवाढीची टक्केवारी. 
एम पूर्व  54 ( 1.3%)  
एल 53 ( 1.3%)

40 दिवसांपेक्षा जास्त कालावधी असलेले विभाग 
बी 49( 1.4%)
जी दक्षिण 48 ( 1.5) 
 जी उत्तर 44 ( 1.6%)
 ए 43 ( 1.6%)