काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज नाणार दौऱ्यावर

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळानं शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती.

Updated: May 2, 2018, 08:17 AM IST

मुंबई: नाणार प्रकल्प रद्द करण्यासाठी भाजप वगळता इतर राजकीय पक्ष आक्रमक झालेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज नाणार दौऱ्यावर आहेत. ते ग्रामस्थांशी संवाद साधणरा आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळानं शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. नाणार प्रकल्प विरोधी कृती समितीसोबत काँग्रेस ताकदीनं उभी राहिलं असं आश्वासन, राहुल गांधींनी दिल्याचं कृती समितीनं सांगितलं. राहुल गांधी यांच्या सुचनेनुसार अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील आज नाणारला भेट देणार आहेत.