राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, कुणी कुणी भरले अर्ज?

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 12, 2018, 12:58 PM IST
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, कुणी कुणी भरले अर्ज? title=

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे.

त्याआधी दुपारी बाराच्या सुमारास काँग्रेसच्या तिकीटावर ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी अर्ज भरला. त्याचप्रमाणे भाजपच्या तिकीटावर नारायण राणे आणि केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही मुरलीधर यांनीही आपले उमेदवारी अर्ज भरले. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही अर्ज भरल्याने या निवडणुकीला वेगळं वळण मिळालं आहे. विजया रहाटकर यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. 

महाराष्ट्रातून एकूण सहा खासदारांची निवड होणार आहे. येत्या २३ तारखेला निवडणूक होतेय. पण सर्वच उमेदवारांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.