तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसान भरपाई: मुख्यमंत्री

तौक्त चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या लोकांना मदतीची घोषणा

Updated: May 25, 2021, 05:02 PM IST
तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसान भरपाई: मुख्यमंत्री title=

दीपक भातुसे, मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली आहे. तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून अनेकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही असे आश्वस्त केले होते त्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली.

निसर्ग चक्रीवादळात दिलेली मदत :

घरांसाठी नुकसान भरपाई

- २५ टक्क्यापेक्षा जास्त घराचे नुकसान झाले असल्यास २५ हजार
- ५० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास ५० हजार व
- पूर्ण घराचे नुकसान झाले असल्यास दीड लाख रुपये मदत मिळणार

घरातील साहित्याचे नुकसान झाले असल्यास

- अन्नधान्य भिजले असल्यास आणि भांड्यांचे नुकसान झाले असल्यास १० हजार रुपये मदत

मच्छिमारांसाठी नुकसान भरपाई

- अंशतः नुकसान झालेल्या बोटींसाठी १० हजार रुपये भरपाई मिळणार
- बोटीचे पूर्ण नुकसान झाले असल्यास २५ हजार रुपये वाढीव मदत
- मच्छिमारांच्या जाळीचे नुकसान झाले असेल तर ५ हजार रुपये वाढीव मदत
- पूर्ण जाळीचे नुकसान झाले असेल तर १० हजार मदत मिळणार

- नुकसानग्रस्त दुकानमालक व टपरीचालकांना नुकसानीच्या 75 टक्के मर्यादेत कमाल 10 हजार रुपये मदत 
- बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीपोटी ५० हजार रुपये प्रतिहेक्टर दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत