'डेक्कन क्वीन'चा ८९ वा वाढदिवस साजरा

 भारतातील पहिली अतिजलद गाडी आणि विद्युत इंजिनावर चालणारी लांब पल्ल्याची पहिली गाडी असा हीचा लौकीक आहे. 

Updated: Jun 1, 2018, 11:29 PM IST

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई :  मुंबई-पुणे शहरांच्या प्रगतीत महत्त्वाचा दुवा ठरलेल्या 'डेक्कन क्वीन'ला आज ८८ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतातील पहिली अतिजलद गाडी आणि विद्युत इंजिनावर चालणारी लांब पल्ल्याची पहिली गाडी असा हीचा लौकीक आहे. 'डेक्कन क्वीन' च्या रुपाने मध्य रेल्वेने पहिली डिलक्स रेल्वे सुरू केली. १७ डब्ब्यांच्या या रेल्वे गाडीत ४ एसी चेअर कार, एक डायनिंग कार, १० सेकंड क्लास चेअर कारसह दोन सेकंड क्लास कम ब्रेक वॅन जोडलेल्या आहेत. १ जून १९३० पासून धावणाऱ्या या गाडीचा अनेकदा कायापालट झाला. नोकरी निमित्त मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच हे एक कुटुंबच झालयं.