राज्यात थंडीचा मुक्काम कायम राहणार

राज्यात थंडी वाढली

Updated: Jan 24, 2019, 03:46 PM IST
राज्यात थंडीचा मुक्काम कायम राहणार title=

मुंबई : पुढचे तीन ते चार दिवस राज्यात थंडीचा मुक्काम कायम राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात दोन दिवसांपासून गारवा जाणवतो आहे. हीच स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. तर 26,27,28 जानेवारीला उत्तर मध्य महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये काही ठिकाणी शीत लहरीची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात 27 तारखेच्या दरम्यान तुरळक पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. 

मागील २ दिवसांपासून राज्यात सवर्त्र थंडीची लाट आहे. थंडीचा हा जोर आणखी काही दिवस असाच राहणार आहे. २ दिवसांपासून राज्यात तापमानात घट पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमान १० अशांच्या खाली गेलं आहे.

हिमालयात तसेच आजुबाजुच्या राज्यात बर्फवृष्टीमुळे शीत लहरी वाहत आहेत. कोरडं हवामान असल्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश सर्वच ठिकाणी थंडीची हुडहुडी वाढली आहे. नाशिक, नागपूर, पुणे या ठिकाणी ही थंडीचं प्रमाण वाढलं आहे.