अबब! उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर केली संपत्ती

उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्न आणि संपत्तीचे तपशील दाखल केले आहेत. 

Updated: May 11, 2020, 11:56 PM IST
अबब! उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर केली संपत्ती title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे किती संपत्ती आहे, याबाबत वारंवार उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नाला अखेर उत्तर मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्न आणि संपत्तीचे तपशील दाखल केले आहेत. त्यानुसार ठाकरे यांच्याकडे 143 कोटी 20 लाख 74 हजार 763 रुपयांचे उत्पन्न दाखवलं आहे. एवढी संपत्ती असलेल्या ठाकरे यांचा व्यवसाय काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ठाकरेंनी आपल्या प्रतिज्ञापत्र सेवेतून मिळणारे वेतन, व्याज, लांभाश, शेअर्समधून मिळणारे उत्पन्न आदी उत्पन्नाचे स्त्रोत दाखवले आहेत. तर रश्मी ठाकरे या व्यवसाय करत असल्याचं नमूद करण्यात आलंय.

उद्धव ठाकरेंकडे गाडी नाही

उद्धव ठाकरे यांचे एवढे उत्पन्न असले तरी त्यांच्या नावे एकही गाडी नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे ठाकरे वापरत असलेल्या आलिशान गाड्या कुणाच्या नावावर आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो. सध्या कोरोनामुळे उद्धव ठाकरे चालक न ठेवता स्वतः गाडी चालवतात. मर्सिडिज कंपनीची ही महागडी गाडी त्यामुळे कुणाच्या नावावर आहे, असाही प्रश्न उपस्थित होतो.

उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

रोख रक्कम

उद्धव ठाकरे - 76,922

हिंदु अविभक्त कुटुंब खातं - 39,124

बँकेतील ठेवी

उद्धव ठाकरे - 1 कोटी 60 लाख 93 हजार 675

हिंदु अविभक्त कुटुंब खातं – 56 लाख 21 हजार 439

बॉण्डसमधील गुंतवणूक

उद्धव ठाकरे – 21 कोटी 68 लाख 51 हजार 1

हिंदु अविभक्त कुटुंब खातं – 29 लाख 58 हजार 149

पोस्टातील बचत

उद्धव ठाकरे– 3 लाख

सोने-चांदी-हिरे

उद्धव ठाकरे - चांदीची भांडी 61 किलो – 23 लाख 20 हजार 736

हिंदु अविभक्त कुटुंब खातं – 53 लाख 48 हजार 305

व्याजरुपी उत्पन्न

उद्धव ठाकरे – 58 लाख 57 हजार 259

हिंदु अविभक्त कुटुंब खातं – 18 लाख 47 हजार 378

बँके खात्यातील रक्कम

उद्धव ठाकरे - 1 कोटी 48 लाख 89 हजार 86

हिंदु अविभक्त कुटुंब खातं – 47 लाख 15 हजार 864

बँकेतील ठेवी

उद्धव ठाकरे - 11 लाख 4 हजार 589

हिंदु अविभक्त कुटुंब खातं – 9 लाख 5 हजार 575

स्वतः आणि पत्नीचे एकत्र – 2 लाख 99 हजार 139

कुटुंबातील संयुक्त बँक खात्यातील रक्कम

5 कोटी 88 लाख 88 हजार 921

शेअर्समधील गुंतवणूक

उद्धव ठाकरे – 1 कोटी 7 लाख 75 हजार 498

एकत्रिक कुटुंब – 29 लाख 58 हजार 149 (3 कोटी 18 लाख 87 हजार 714)

अनलिस्टेड शेअर्समधील गुंतवणूक

उद्धव ठाकरे - 20 कोटी 45 लाख 90 हजार 300

म्युच्युअल फंड्स

उद्धव ठाकरे – 14 लाख 85 हजार 203

विमा गुंतवणूक

उद्धव ठाकरे – 3 लाख

स्थावर मालमत्ता

शेतजमीन आणि मुंबईतील वांद्रे येथील दोन घरं आणि कर्जतचे फार्म हाऊस यांची एकूण किंमत - 52 कोटी 44 लाख 57 हजार 984

अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे एकूण उत्पन्न -  78 कोटी 17 लाख 71 हजार 972 कोटी

 
रश्मी ठाकरे यांची संपत्ती

रोख रक्कम - 89,679

बँकेतील रक्कम - 12 लाख 57 हजार 912

बँकेतील ठेवी – 22 लाख 28 हजार 647

व्याजरुपी उत्पन्न - 56 लाख 17 हजार 716

विमा गुंतवणूक - 3 लाख

म्युच्युअल फंड - 4 लाख 81 हजार 593

अनलिस्टेड शेअर्समधील गुंतवणूक -  31 कोटी 93 लाख 26 हजार 800

शेअर्समधील गुंतवणूक - 1 कोटी 81 लाख 54 हजार 67  

रश्मी ठाकरे यांनी दिलेले कर्ज – 6 लाख 66 हजार 112              

पोस्टातील बचत - 3 लाख

बॉण्डसमधील गुंतवणूक – 33 कोटी, 79 लाख 62 हजार 460

बँकेतील ठेवी - 34 लाख 86 हजार 559

दागिने - सोन्याचे दागिने – 69.63 ग्रॅम – 2 लाख 87 हजार 306

हिऱ्यांचे दागिने – 647.648 ग्रॅम – 1 कोटी 32 लाख 33 हजार 623

स्थावर मालमत्ता - 28 कोटी 92 लाख 59 हजार 336

हे सर्व मिळून रश्मी ठाकरे यांची एकूण संपत्ती - 65 कोटी 9 लाख 02 हजार 791 रुपये इतके आहे.

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची एकत्रित संपत्ती – 143 कोटी 20 लाख 74 हजार 763 रुपयांच्या घरात जाते.