मुंबई : सिद्धिविनायक चरणी... महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, कर्जमाफीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होवू दे...असं मागणं मागितल्याचं सांगितलं जात आहे, तर राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी, मी बाप्पा चरणी हीच मागणी केली, जे मागील सरकारकडून प्रश्न सुटले नाहीत, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक याविषयी जे निर्णय होवू शकले नाहीत, ते प्रश्न या सरकारकडून सुटू देत, ही मागणी मी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तर कर्जमाफीचा निर्णय, हा हिवाळी अधिवेशानात, तसेच राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती पाहून, विचार विनिमय करून यावर निर्णय घेण्यात येईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. पुढच्या मंत्रिमंडळात अजित पवार दिसतील का? यावर जयंत पाटील यांनी सावधपणे उत्तर दिलं की, याबाबतीत जे काही निर्णय आहेत ते आमचे सर्वेसर्वा शरद पवार घेत असतात, यावर मी काहीही बोलणं गैर होईल.
तसेच आमच्या राष्ट्रवादी पक्षावर आता कोणतंही संकट राहिलेलं नाही, आम्ही सर्व एक आहोत, एक राहणार असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.