मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली सरसंघचालक भागवत यांची भेट; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. 

Updated: Aug 2, 2022, 07:55 AM IST
मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली सरसंघचालक भागवत यांची भेट; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती title=

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरसंघचालक यांची  दादरच्या संघ कार्यालयात तब्बल 50 मिनिटं तिघांमध्ये बैठक झाली. 

या बैठकीत हिंदुत्वावर चर्चा करण्यात आली. यावेळी सरसंघचालकांनी मुख्यमंत्र्यांना आरएसएसची काही पुस्तकं भेट दिली.