'वर्षा'वर दहा दिवसांसाठी गणेश विराजमान, मुख्यमंत्र्यांनी घातलं साकडं

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर वाजत गाजत गणरायाचं आगमन झालंय.

Updated: Aug 25, 2017, 01:17 PM IST
'वर्षा'वर दहा दिवसांसाठी गणेश विराजमान, मुख्यमंत्र्यांनी घातलं साकडं title=

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर वाजत गाजत गणरायाचं आगमन झालंय.

सकाळी गणपतीच्या 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणपतीची पूजा झाल्यावर गणपतीची आरती करण्यात आली. 

वर्षावर श्रीगणेशाची दहा दिवसांसाठी स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी - सहकारी उपस्थित होते. 

उल्लेखनीय म्हणजे, इको फ्रेंडली गणपतीसाठी मुख्यमंत्र्यांनी शाडूच्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.