सिडकोच्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी; लवकरच घरांचा मिळणार ताबा

सिडको लाभार्थ्यांना लवकरच घराचा ताबा मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना घरभाडे भरण्यापासून दिलासा मिळणार आहे.

Updated: Apr 3, 2021, 09:40 AM IST
सिडकोच्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी; लवकरच घरांचा मिळणार ताबा  title=

मुंबई :  गेली ६ महिने घरांचा हप्ता आणि घरभाडे भरणा-या सिडकोच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. 

मे ते सप्टेंबरदरम्यान या लाभार्थ्यांना त्यांच्या घराचा ताबा मिळणार आहे. सिडकोने दोन वर्षांपूर्वी 24 हजार घरांची सोडत काढली होती. त्यातील कागदपत्रे पूर्ण असलेल्या लाभाथ्र्यांना घरांचा ताबा हा ऑक्टोबर २०२० मध्ये दिला जाणार होता. 

करोनामुळे लाभार्थांना घराचा ताबा देण्यात वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे सिडकोच्या लाभार्थ्यांमध्ये संतापाचं वातावण होतं.

मात्र आता सिडकोचं काम प्रगतीपथावर असून  दोन महिन्यांत पहिल्या टप्प्यातील ग्राहकांना घरे दिली जातील. असं आश्वासन सिडकोनं दिले आहे.