मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर?

पंतप्रधान नरेंद्र मोदीच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देखील नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर होते.

Updated: Aug 29, 2018, 10:49 PM IST
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर? title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदीच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर होते. गडचिरोलीत नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईनंतर खवळलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) यांनी पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या जवळच्यांच्या हत्येचा धमकी दिली होती.  

मे महिन्यात देण्यात आलेल्या या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. झी मीडियाच्या हाती ही पत्र असून त्यात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या हत्येच्या धमकीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रात मुख्यमंत्री आणि त्यांच्या  जवळच्यांची निर्घृण हत्या करू आणि त्यासाठी आम्ही मृत्यु पत्करायला देखील तयार असल्याच म्हटलं आहे.