मुंबई : छोटा शकील आणि सौत्या नावाच्या गुंडाने १२ सप्टेंबर १९९२ रोजी जेजे हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा कट रचला, हॉस्पिटलवर हल्ल्यासाठी एके-47चा वापर केला गेला. पोलीस पंचनाम्यानुसार ५०० राऊंड फायर झाले. यावर 'डोंगरी टू दुबई'चा लेखक झैदी लिहितो, दाऊदचा बदला पूर्ण झाला होता, आणि डी गँगमध्ये छोटा राजनच्या अंताची देखील सुरूवात झाली होती. दाऊदने आपल्या खास बैठकीत छोटा शकीलला सामील करणे सुरू केलं आणि छोटा राजनपासून दुरावा सुरू केला. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अनेकांचे जीव गेले, स्फोटानंतर मुंबईच्या लोकांमध्ये दाऊद इब्राहिम आणि त्याचा साथीदार छोटा राजन यांच्याविषयी चीड निर्माण झाली.
यावर एस हुसैन झैदी यांनी लिहिलं आहे, छोटा राजनने न्यूज पेपर्सना फॅक्स पाठवून आपली बाजू ठेवली, आणि छोटा राजनने दाऊद इब्राहिमचा बचाव देखील केला.
असं काही नाही की, गँगमध्ये छोटा राजन आणि छोटा शकील यांच्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न दाऊद इब्राहिमने केला नाही, झैदी लिहितो की, दाऊदने एकदा संतापून म्हटलं होतं, 'नाना (छोटा राजन) माझ्या वाईट काळातील साथीदार आहे, मी त्यांच्याविषयी वाईट ऐकू शकत नाही, आपापसातलं भांडण ही धंद्याची हत्या आहे.'
दाऊदच्या बोलण्यावर तरीही छोटा शकीलच्या गँगमधील लोक खुश नव्हते, अनेक वेळा छोटा शकीलकडून छोटा राजनला 'काफिर' म्हणण्यात आलं, आणि महत्वाच्या बैठकीत छोटा राजनला सामिल करण्यात आलं नाही. यानंतर १९९३-९४ येई पर्यंत दाऊद गँगचे लोकं आणि छोटा राजन एकमेकांच्या जीवावर उठले. छोटा राजनने दाऊद गँगसाठी काम करणं बंद केलं, छोटा राजनला आता भारतात परतायचं होतं.