भुजबळांबाबत महत्त्वाचा निर्णय; जामीन मिळण्याची शक्यता

महाराष्ट्र सदन आणि इतर गैरव्यवहारांप्रकरणी गेले 21 महिन्यांपासून तुरूंगात असलेल्या छगन भुजबळ यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 18, 2017, 10:37 AM IST
भुजबळांबाबत महत्त्वाचा निर्णय; जामीन मिळण्याची शक्यता title=

मुंबई : महाराष्ट्र सदन आणि इतर गैरव्यवहारांप्रकरणी गेले 21 महिन्यांपासून तुरूंगात असलेल्या छगन भुजबळ यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. भुजबळ हे राज्याचे माजी बांधकांमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत. छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज (सोमवार) निर्णय होणार आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम़  एस़  आजमी यांच्यासमोर भुजबळांच्या जामीनावर सुनावनी होणार असून, न्यायाधीश जामीन अर्जावर काय निर्णय देतात याबाबत उत्सुकता आहे.

कायद्यातील रद्द कलमाचा आधार

दरम्यान, छगन भुजबळ आणि त्यांचा मुलगा समीर भुजबळ यांनी जामिनासाठी पीएमएलए कोर्ट आणि हायकोर्टाकडे अनेकदा अर्ज केले. मात्र, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावले. पण, सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार  पीएमएलए कायद्यातील कलम 45 (1) असंविधानिक असून, ते रद्द झाले आहे. त्यामुळे रद्द झालेल्या या कलमाचा आधार गेत भुजबळ यांनी पुन्हा एकदा न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला असून, त्यावर सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे.

ईडीचा जामीनाला तीव्र विरोध

दरम्यान, ईडीने या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला आहे. पीएमएलएचे कलम 45 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असले तरी त्याआधारे भुजबळांना जामीन देता येणार नाही़  त्यांना आपण गुन्हा केला नाही हे सिद्ध करावे लागेल, अशी भूमिका ईडीने घेतली आहे.