Liquor Ban | दारूबंदी करून काय साध्य झालं? मंत्रिमंडळात चर्चा होणार

राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात 2015 पासून दारूबंदी ( liqure ban ) सुरू आहे. या दारूबंदीचा खरंच फायदा झाला आहे का? याबाबत लोकांच्या काय भावना आहेत याबाबत राज्य सरकारने उच्चस्तरीय अभ्यास समिती नेमली होती. या समितीने सविस्तर अभ्यास करून आपला अहवाल सादर केला आहे. 

Updated: Mar 11, 2021, 09:36 AM IST
Liquor Ban | दारूबंदी करून काय साध्य झालं? मंत्रिमंडळात चर्चा होणार title=

Mumbai : राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात 2015 पासून दारूबंदी ( liqure ban ) सुरू आहे. या दारूबंदीचा खरंच फायदा झाला आहे का? याबाबत लोकांच्या काय भावना आहेत याबाबत राज्य सरकारने उच्चस्तरीय अभ्यास समिती नेमली होती. या समितीने सविस्तर अभ्यास करून आपला अहवाल सादर केला आहे. 

समितीने संबधित अहवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्याकडे सुपूर्द केला आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडेही अहवाल पाठवला जाणार असून त्यानंतर तो मंत्रीमंडळात चर्चेसाठी ठेवला जाणार आहे.

चंद्रपूर जिल्यात साल 2015 पासून दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सामाजिक आणि आर्थिक बाबींवर याचा काय परिणाम झाला दारूबंदीबाबत जिल्ह्यातील नागरिकांच्या काय भावना आहेत याचा निष्कर्ष  काढण्यासाठी माजी सनदी अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती.

15 जानेवारी ते 5 मार्च या कालावधीत समितीने दारूबंदीच्या सामाजिक परिणामांचा अभ्यास करण्यासाठी 11 बैठका घेतल्या. 

समितीचे कामकाज 7 मार्च रोजी पूर्ण झाले आहे. lत्यानंतर सरकारला हा अहवाल सादर करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना संसर्ग झाल्याने ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होऊ शकतील तेव्हा  या अहवालावर चर्चा करण्यात येणार आहे.