आताची मोठी बातमी! शाई फेक प्रकरणात मोठा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांना 'या' सूचना

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक केल्याप्रकरणी आरोपींवर 307 कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर 11 पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं, याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे

Updated: Dec 13, 2022, 06:03 PM IST
आताची मोठी बातमी! शाई फेक प्रकरणात मोठा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांना 'या' सूचना title=

Maharashtra Politics : भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर शाईफेक (Ink Throw) करण्यात आली होती.  पोलीस संरक्षणात असतानाही शाईफेकीचा प्रकार घडल्याने 11 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. यात तीन अधिकारी आणि आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मनोज गरबडे (Manoj Garbade) आणि त्यांच्या दोन साथीदारांनी पोलिसांची सुरक्षा भेदून चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली होती. या तीघांवर 307 कलम (जीवे मारण्याचा प्रयत्न करणे) लावण्यात आलं होतं. 

देवेंद्र फडणवीस यांचा आदेश
दरम्यान, आता याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. आरोपींवर लावण्यात आलेलं 307 कलम आणि 11 पोलिसांचं निलंबन (Suspension) सुद्धा मागे घेण्याचे आदेश देवेंद्र फडवणीस यांनी दिले आहेत. 

काय घडलं होत त्यादिवशी?
पिंपरी चिंचवड इथं एका कार्यक्रमासाठी आले असताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर अचानक शाईफेक करण्यात आली. पैठणमधल्या एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु करताना सरकारचं अनुदान घेतलं नहाी, तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली, तेव्हाच्या काळात 10 रुपये देणारी लोकं होती, आता 10 कोटी रुपये देणारी लोकं आहे, असं वक्तव्य केलं होतं. 

हे ही वाचा : नवी मुंबईत धक्कादायक घटना, दारुड्याच्या हाती शाळेच्या बसचं स्टेअरिंग

 

ज ठाकरे यांनीही केली होती मध्यस्थी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावर ही गोष्ट घातली होती. राज ठाकरे यांनी फडणवीसांसोबत याबाबत चर्चा केली. फडणवीस यांनीही त्यांचं निलंबन मागे घेण्याचा शब्द राज ठाकरे यांना दिला. याबाबत राज यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली. 'हे सगळं जेव्हा मला कळलं तेव्हा मला सर्वप्रथम हळहळ वाटली ती माझ्या पोलीस बांधवांबद्दल. पोलिसांना हा प्रकार रोखता आला नाही हे मान्य, पण तरीही त्यांच्यावरची कारवाई मला तरी अनाठायी वाटली आणि त्यामुळे मी अस्वस्थ होतो. माझं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याशी देखील बोलणं झालं. पोलिसांवरच निलंबन मागे घेऊन, त्यांना पुन्हा सेवेत घ्यावं अशी विनंती मी त्यांना केली, ज्याला त्यांनी तात्काळ होकार दिल्याचं' राज ठाकरे यांनी सांगितलं.