न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची फाईल पुन्हा उघडणार?

न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूचं सत्य उलगडणार ?

Updated: Jan 9, 2020, 04:56 PM IST
न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची फाईल पुन्हा उघडणार? title=

मुंबई : न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यू प्रकरणाची बंद झालेली फाईल पुन्हा उघडण्यात येणार आहे. तसे संकेत गृहमंत्र्यांनी दिले आहे. लोया मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यावरुन विरोधकांनी मात्र यावर टीका केली आहे. लोया हे सीबीआय कोर्टाचे न्यायमूर्ती होते. १ डिसेंबर २०१४ ला त्यांचा नागपुरात एका लग्नासाठी गेले असताना मृत्यू झाला. लोया यांचा हार्टअटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. गुजरातमधल्या सोहराबुद्दीन एन्काऊण्टर प्रकरणाची सुनावणी लोयांच्या विशेष न्यायालयात सुरू होती. 

लोया यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची शंका त्यांच्या बहिणीनं व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक याचिका सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात दाखल झाल्या. मात्र सुप्रीम कोर्टानं गंभीर प्रकरण म्हणून याची दखल घेतली होती. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात खटले चालल्यानंतर अखेर १९ एप्रिल २०१८ ला सुप्रीम कोर्टानं लोयांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणाऱ्या सगळ्या याचिका फेटाळून लावल्या. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं की, 'मी संबंधित व्यक्तींची भेट घेईन आणि या प्रकरणासंदर्भात त्यांचे म्हणणे ऐकून घेईन आणि नंतर पुढील आणि निष्पक्ष चौकशीची आवश्यकता असल्यास ते ठरवेल.'

आता पुन्हा या प्रकरणात कुणी तक्रार केली तर लोयांच्या मृत्यूची फाईल पुन्हा उघडली जाईल.