ट्रॅकवरील कचरा हटवण्यासाठी मध्य रेल्वे घेणार मेगाब्लॉक

ठाणे स्टेशनजवळ घसरलेली मालगाडी कचऱ्यामुळे घसरल्याची बातमी सर्वप्रथम झी 24 तासने बुधवारी दाखवली. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 8, 2017, 10:27 AM IST
ट्रॅकवरील कचरा हटवण्यासाठी मध्य रेल्वे घेणार मेगाब्लॉक title=

मुंबई : ठाणे स्टेशनजवळ घसरलेली मालगाडी कचऱ्यामुळे घसरल्याची बातमी सर्वप्रथम झी 24 तासने बुधवारी दाखवली. 

झी 24 तासच्या बातमीनंतर आता मध्य रेल्वेला जाग आलीय. आता हा कचरा ट्रॅकवरून काढण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. कचऱ्यामुळे ट्रॅकचं आयुष्य घटतंय. 

शहरातील कचरा ट्रॅकवर

शहरातला कचराही ट्रॅकवर येत असल्याने इथे गाड्या चालवणं कठीण झालंय. गेल्या सहा महिन्यात मध्य रेल्वेने तब्बल 15 हजार क्युबिक मीटर कचरा ट्रॅकवरून उचलला. 

कचऱ्यामुळे मालगाडी घसरली आणि वाहतूक विस्कळीत

बुधवारी दिवा स्थानकाजवळी पारसिक बोगद्याजवळ मालगाडीचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे या मार्गावरील ५०हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर १००हून अधिक लोकल फेऱ्या उशिराने धावत होत्या.