मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द, वाहतूक तासभर उशिरा

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

Updated: Jul 8, 2018, 11:08 AM IST
मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द, वाहतूक तासभर उशिरा title=

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाण्यालाही पावसाने झोडपून काढलं आहे. शनिवारी देखील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली होती. रविवारी देखील काही ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे तासभर अशिराने धावत आहे. हार्बर लोकलही १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. हिंदमाता, किंग्ज सर्कल, चेंबूर आणि सायन या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 

मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर आहे. ठाण्यात ही आज पावसाने विश्रांती घेतलेली नाही. सुट्टीचा दिवस असल्याने चाकऱमान्यांना दिलासा मिळाला आहे. इतर प्रवाशांना आणखी त्रास होऊ नये आणि मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेने भायखळा आणि विद्याविहार दरम्यानचा आजचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. हार्बर मार्गावर मात्र मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.