Mumbai Local News : मध्य रेल्वेची (Central Railway) लोकल सेवा विस्कळीत झाल्याने याचा मनस्ताप प्रवासांना सहन करावा लागत आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक थांबविण्यात आली आहे. ( track broken between Umbermali railway station) रेल्वेरुळ दुरुस्तीचं काम सुरु आहे. दरम्यान, ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल होत आहेत. (Central Railway local service has been disrupted)
कसारा आणि उंबरमाळी दरम्यान अप दिशेची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे लोकल सेवा ठप्पआहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक खोळंबली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रेल्वेकडून लोकल सेवा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पण ही वाहतूक कधी सुरु होणार याबाबत काहीही सांगण्यात येत नसल्याने प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, लोकल सेवेचा फटका वंदे भारत रेल्वेलाही बसला आहे. वंदे भारत ही गाडी पुढे काढण्यासाठी गोरखपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस खर्डीमध्ये थांबवून ठेवण्यात आली आहे. तर एक लोकल वेगमर्यादा एकदम कमी करुन घटनास्थळावरुन पुढे नेण्यात आली असून आहे. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
मध्य रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच दणका दिला आहे. फुटक प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने घसघशीत 100 कोटी रुपयांची वसुली केली आहे. गेल्या दहा महिन्यांत 18 लाख प्रवाशांकडून मध्य रेल्वेने ही कमाई केली आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.
विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे उपनगरीय वाहतूक, मेल-एक्स्प्रेस, रेल्वेच्या विशेष गाड्या इत्यादींमध्ये तिकीट तपासणी करण्यात येते. यासाठी तिकीट तपासनीसांची विशेष पथके स्थानकांवर तैनात करण्यात आली होती. त्यांच्याकडून ही वसुली करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या ताब्यात असलेल्या ठाणे मेंटल हॉस्पिटलच्या जमिनीवर नवीन स्टेशन बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (HC) शुक्रवारी 3 मार्च रोजी ठाणे मेंटल हॉस्पिटलच्या जमिनीचा काही भाग रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी हस्तांतरित करण्यावरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील महत्वाच्या ठाणे स्थानकावर होणारी गर्दी नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे.