मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांची पायपीट

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. लोकल गाड्या एकाच ठिकाणी ठप्प असल्याने प्रवाशांना पुढील स्टेशन गाठण्यासाठी पायपीट करावी लागली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 23, 2018, 01:58 PM IST
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांची पायपीट title=

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. लोकल गाड्या एकाच ठिकाणी ठप्प असल्याने प्रवाशांना पुढील स्टेशन गाठण्यासाठी पायपीट करावी लागली.

 धीम्या आणि जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाचा सांधा निसटल्याने वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण आणि सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक ठप्प होती.

सायन - माटुंगा दरम्यान अर्धा तास लोकल वाहतूक विस्कळीत होती. त्यामुळे प्रवाशांचा ४० ते ४५ मिनिटे खोळंबा झाला. आता लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, गाड्या उशिराने असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.