मोठी बातमी! केदार दिघेंवर बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल

केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे आहेत

Updated: Aug 2, 2022, 11:22 PM IST
मोठी बातमी! केदार दिघेंवर बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल title=
(फोटो सौजन्य - फेसबुक)

Kedar Dighe : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe)यांच्यावर बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्य आठवड्याच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली होती. 

केदार दिघे यांची नियुक्ती करत शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता.

त्यानंतर आता केदार दिघे यांच्यावर मुंबईच्या एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांच्यासह आणखी एका व्यक्तीवर बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केदार दिघे यांचा मित्र रोहित कपूर यांनी बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तर केदार दिघे यांनी तक्रार करु नये म्हणून धमकावले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.