बुलेट ट्रेनवरून विधानपरिषदमध्ये घमासान

विधानपरिषदमध्ये बुलेट ट्रेन वरून घमासान चर्चाच झाली. संजय दत्त यांनी बुलेट ट्रेनचा प्रश्न अल्पकालीन चर्चाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. 

Updated: Aug 11, 2017, 01:46 PM IST
बुलेट ट्रेनवरून विधानपरिषदमध्ये घमासान title=

मुंबई : विधानपरिषदमध्ये बुलेट ट्रेन वरून घमासान चर्चाच झाली. संजय दत्त यांनी बुलेट ट्रेनचा प्रश्न अल्पकालीन चर्चाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. 

बुलेट ट्रेनचा ३३ टक्के मार्ग राज्यातून तर उर्वरित मार्ग गुजरातमधून जात आहे, असं असतांना महाराष्ट्र प्रकल्पाचा अर्धा खर्च का उचलणार, बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा, असा प्रश्न संजय दत्त यांनी उपस्थित केला. 

तसेच एकीकडे सरकारकडे पैसे नाहीत. शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, मग महागड्या बुलेट ट्रेनचा घाट कशाला, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या महागड्या ट्रेनचा तिकीट दर विमान तिकीटापेेक्षा जास्त आहे. या ट्रेनमधून कोण प्रवास करणार आहे, आदी प्रश्न उपस्थित करण्यात आलेत.

मात्र या प्रकल्पासाठी १२५ कोटी पहिला हफ्ता राज्याला द्यावा लागणार. याचा तात्काळ राज्यावर भर पडणार नसल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.