मुंबई : शहरात काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रात्रीच्या सुमारास मालाड मालवणी भागातील न्यू कलेक्टर कम्पाऊंड परिसरात एका चार मजली इमारतीचा (Mumbai Building collapse) काही भाग कोसळला आहे. घराचा स्लॅब कोसळून शेजारील दोन मजली घरांवर पडला. या दुर्घटनेत 17 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. मात्र दुर्दैवाने त्यांतील 11 व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 7 व्यक्तींना जवळच्या बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुर्घटना ठिकाणी अग्निशमन दलाकडून बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. आतापर्यंत 15 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मुंबईतील झोन 11 चे पोलीस उपायुक्त (डीसीपी) विशाल ठाकूर म्हणाले की, 5 मुलांसह महिलांसह आतापर्यंत 15 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्यांच्यासाठी बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, पावसाने आता मुंबई आणि परिसरात विश्रांती घेतली असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लोकल वाहतूक पूर्वपदावर येत असून रस्ते वाहतूकही सुरळीत होत आहे. शहरात अधूनमधून मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत आहे.
#UPDATE | 15 people including women & children have been rescued & are shifted to the hospital. There is a possibility of more people stuck under the debris. Teams are present here to rescue people," says Vishal Thakur, DCP Zone 11, Mumbai pic.twitter.com/MKGPdp3kcA
— ANI (@ANI) June 9, 2021
अपघातावेळी इमारतीत 20 हून अधिक लोक होते. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी 20 हून अधिक लोक इमारतीत राहत होते. या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिस दाखल झाले आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी कचराकुंडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले.
दरम्यान, काल मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. सकल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे रस्ता तसेच रेल्वे वाहतूक मंदावली होती. तर ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वाशी, अंधेरी अशी हार्बर रेल्वे सेवा ठप्प होती. कुर्ला आणि सायन, विक्रोळी येथे पाणी रुळावर आल्याने याचा फटका रेल्वेला बसला.
हिंदमाता, सायन येथे पाणी साचले होते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. दुपारनंतर समुद्राला आलेल्या भरतीला ओहोटी लागल्यानंतर शहरातील साचलेले पाणी समुद्रात गेल्याने वाहतूक हळहळू पूर्वपदावर आली. मिठी नदीतील पाणी माहिमच्या खाडीत जात असलेल्या पाण्याचा वेग पाहता सकाळपासून मिठी नदीत तसेच मुंबईत तुंबलेल्या पाण्याचा अंदाज आला. कुर्लाजवळच्या एलबीएस रोडवर मिठी नदीचं पाणी आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.