मुंबई : क्रिस्टल अग्निकांडप्रकरणात दोषी आढळलेल्या इमारतीचा बिल्डर सुपारीवाला याला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. परळमध्ये असणाऱ्या क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झालाय. दरम्यान, क्रिस्टल टॉवरला भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट किंवा ओसीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तसेच अग्निशमन यंत्रणा बंद ठेवल्याप्रकरणी बिल्डर सुपारीवाला याला पोलिसांनी अटक करण्यात आली होती.
क्रिस्टल टॉवरमध्ये आगीच्या धुरामुळे गुदमरून चौघांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोन रहिवाशांनी लिफ्टनं खाली उतरण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान १६ जणांवर केईएममध्ये उपचार आहेत.
क्रिस्टल टॉवरला प्रमाणे मुंबईतील ५६ हजार इमारतींना ओसीच नसल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आलीय. क्रिस्टल या १४ मजल्यांच्या या इमारतीत अनेक कुटुंब राहत होती. पण मूलभूत सुविधाच नसल्याचं पुढे आलंय. २०१६ मध्ये क्रिस्टल इमारतीच्या बिल्डरला नोटीस पाठवली होती. पण कारवाई मात्र झालीच नाही. इमारतीत आगीवर नियंत्रण आणणारी कुठलीच यंत्रणाही नव्हती. त्यामुळेच आता जशी बिल्डरवर कारवाई होईल तशी पालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का? असा प्रश्न विचारण्यात येतोय.