Covid मुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना BEST कडून मोठा दिलासा
बेस्टने कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
Updated: Jul 2, 2021, 06:51 PM IST
मुंबई : कोरोनाच्या (Corona) महामारीत संपूर्ण राज्यात लॉकडाऊन होतं. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूकीतून प्रवास करण्याची परवानगी होती. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी (Best Employee) या काळात जीवावर उदार होऊन अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बससेवा पुरवली. पण या दरम्यान बेस्टच्या काही कर्मचाऱ्यांचा कोरोनाने गाठलं. उपचारादरम्यान या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बेस्टने कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. (brihanmumbai electric supply and transport give 50 lakh rupees each to the heirs of employee who death corona deceased)
ज्या बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीवाला मुकावे लागले, त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना बेस्टकडून आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. यासाठी पालिका 50 कोटींचं अनुदान बेस्टला देणार आहे. पालिकेच्या महासभेच्या मंजुरीनंतर हा निधी बेस्टला हस्तांतरित होणार आहे.
आतापर्यंत बेस्टच्या 3 हजार 482 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी 100 कर्मचाऱ्यांचा कोरानामुळे घात झाला. अशा 100 कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.