'धनुष्य बाणा'ची लढाई आता 'तलवारी'वर?

शिवसेना कुणाची आणि त्याहीपेक्षा धनुष्य बाण चिन्ह कुणाचं? याचा फैसला निवडणूक आयोग लवकरच सुनावणार आहे.    

Updated: Oct 7, 2022, 12:03 AM IST
'धनुष्य बाणा'ची लढाई आता 'तलवारी'वर?  title=

मुंबई : शिवसेनेचं (Shiv Sena) धनुष्यबाण (Bow Arrow Symbol) हे निवडणूक चिन्ह कुणाला मिळणार, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. निवडणूक आयोग (election commission of india) याबाबत लवकरच निर्णय घेणाराय. पण ठाकरे विरुद्ध शिंदे (Thackeray VS Shinde) वादात हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलं, तर काय? पाहूयात हा रिपोर्ट. (bow and arrow symbol fight in uddhav thackeray vs eknath shinde see full report)

शिवसेना कुणाची आणि त्याहीपेक्षा धनुष्य बाण चिन्ह कुणाचं? याचा फैसला निवडणूक आयोग लवकरच सुनावणार आहे. आगामी निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच मिळावं, यासाठी ठाकरे आणि शिंदे गटानं प्रयत्नांनी पराकाष्ठा सुरू केलीय. मात्र या वादात धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं देखील जाऊ शकतं, असा जाणकारांचा अंदाज आहे.

'धनुष्य बाण' गोठवलं तर?

पर्यायी निवडणूक चिन्ह काय असावं, याची तयारी ठाकरे आणि शिंदे गटानं केल्याचं समजतंय. ठाकरे गटाकडून ढाल तलवार आणि गदा या चिन्हासाठी आग्रह धरला जाऊ शकतो.  शिवसेनेनं याआधी ढाल तलवार, इंजिन, कप बशी अशा विविध चिन्हांवर निवडणूक लढवलीय. तर शिंदे गट 'तलवार' या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

त्यामुळंच की काय, शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात 51 फुटांची भव्य तलवार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. एवढंच नव्हे तर शिंदेंना 12 फुटांची चांदीची तलवार भेट देण्यात आली. त्यामुळं आता धनुष्यबाणाची लढाई तलवारीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दस-याच्या मुहूर्तावर तलवारीची पूजा करून एकनाथ शिंदेंनी भविष्यातल्या लढाईची दिशा स्पष्ट केलीय.. पण शिंदे असोत, नाहीतर ठाकरे... नवं निवडणूक चिन्ह जनतेत रुजवायचं झाल्यास दोन्ही गटांचा कस लागणाराय, एवढं नक्की...