Salim Khan threated : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. याआधीही सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता सलमान खानचे वडिल सलीम खान (Salim Khan) यांना धमकी (Threat) देण्यात आल्याचं समोर आलं आहे. सलीम खान मॉर्किंग वॉकला गेले असताना स्कूटीवरुन बुर्का घालून आलेल्या महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) नावाने त्यांना धमकी दिली. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर फायरिंगची घटना घडली होती. याचा तपास अद्याप सुरु आहे.
'क्या लॉरेंस बिश्नोई को भेजूं क्या..'
18 सप्टेंबर 2024 ला नेहमीप्रमाणे सलीम खान मॉर्निंग वॉकला गेले होते. वॉक केल्यानंतर तिथल्या आराम करण्यासाठी ते बेंचवर बसले. त्याचवेळी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेकडून एक महिला आणि एक पुरुष स्कूटीवरुन सलीम खान बसलेले त्या ठिकाणी आले. महिलेने बुर्का परिधान केला होता. बुर्का घातलेली ती महिला सलीम खानकडे आली आणि तीने 'लॉरेंस बिश्नोई को भेंजू क्या...' अशी धमकी देत तिथून पळ काढला. सलीम खान यांनी तात्काळ पोलिसांनी खबर केली.
पोलिसांनी सुरु केला तपास
पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरु केला. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर पोलिसांनी महिला आणि त्या स्कूटीचा तपास सुरु केला. या प्रकरणी बांद्रे पोलिसांनी महिला आणि एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीए. पोलीस तपास स्कूटीवरुन आलेली बुर्का घातेली महिला ही त्या तरुणाची गर्लफ्रेंड आहे. दोघांनी सलीम खान यांना धमकी का दिली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
सलमान खान शुटिंगसाठी मुंबईबाहेर
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणेश पूजेला सलमान खान आणि बहिण अर्पिता यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत 17 सप्टेंबरला मुंबई विमानतळावर सलमान खान दिसला होता. आपला आगामी चित्रपट 'सिकंदर'च्या शुटिंगसाठी सलमान खान परदेशात गेल्याचं सांगण्यात येत आहे.
सलमानला अनेकवेळा धमकी
सलमान खानला याआधीही अनेकवेळा लॉरेन्स बिश्वनोई गँगकडून धमकी देण्यात आली आहे. यामुळे सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. जानेवारी 2024 मध्ये सलानच्या पनवेल इथल्या फार्म हाऊसमध्ये दोन लोकांनी जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला होता. मार्चमध्ये धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. तर एप्रिलमधअेय सलमानच्या मुंबईतल्या घरावर फायरिंग करण्यात आली होती.