आगीच्या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून कडक पावलं

कमला मिल कंपाऊंडमधील मोजो आणि वन अबव्ह या रेस्टो पब्सना लागलेल्या भीषण आगीनंतर अखेर मुंबई महापालिका आयुक्तांनी कडक पावलं उचलली आहेत.

Updated: Jan 8, 2018, 09:11 AM IST
आगीच्या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून कडक पावलं title=

मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील मोजो आणि वन अबव्ह या रेस्टो पब्सना लागलेल्या भीषण आगीनंतर अखेर मुंबई महापालिका आयुक्तांनी कडक पावलं उचलली आहेत. यानुसार मुंबईत अग्निसुरक्षा सेलच्या कामकाजाला आजपासून सुरूवात होणार आहे.

काय होणार कारवाई

यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आस्थापनांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. यामध्ये कुठलीही नोटीस न देता त्यांना सील ठोकलं जाईल.

मोजो बिस्ट्रो पबच्या मालकाला पोलीस कोठडी 

कमला मिल अग्नीतांडवाला जबाबदार असलेल्या मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शनिवारी पोलिसांनी त्याला अटक केली होती. रविवारी दुपारी त्याला भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं. तर मोजोच्या मालकांवर यापूर्वीच पोलिसांनी मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केलाय. तर वन अबॉव्हचे तिन्ही मालक फररा घोषित करण्यात आलेयत. त्यांच्यावर १ लाखाच बक्षीसही पोलिसांनी जाहीर केलंय.