मुंबई महापालिकेने कोविशिल्ड खासगी लसीकरण केंद्रांची यादी केली जाहीर, पाहा

 बोगस लसीकरण झाल्याचे निष्पन्न झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आता अधिक सावध  झाली आहे. कोणताही धोका नको म्हणून पालिकेने मुंबईत कोविशिल्डच्या शनिवारी कोविड -19 लसीकरण केंद्रांची यादी जाहीर केली आहे.

Updated: Jul 3, 2021, 09:35 AM IST
मुंबई महापालिकेने कोविशिल्ड खासगी लसीकरण केंद्रांची यादी केली जाहीर, पाहा title=
संग्रहित छाया

मुंबई : Covid-19 Updates: कांदिवली येथे बोगस लसीकरण झाल्याचे निष्पन्न झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका Brihanmumbai Municipal Corporation (BMC) आता अधिक सावध  झाली आहे. कोणताही धोका नको म्हणून पालिकेने मुंबईत कोविशिल्डच्या शनिवारी कोविड -19 लसीकरण केंद्रांची यादी जाहीर केली आहे. (private vaccination centres) शहरात बनावट लसीकरण ( Corona vaccination) करण्याच्या अनेक तक्रारी आल्या तसेच याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर काही दिवसानंतर हा बदल करण्यात आला आहे. तसेच याआधी कोरोना लस डोसचा पुरवठा न झाल्याने शहरातील आणि शासकीय केंद्रांवरील लसीकरण मोहीम स्थगित केली होती. आता पालिकेने लसीकरण केंद्राची यादी जाहीर केली आहे. तेथेच नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

मुंबई पालिकेने कोरोना लसीचा पुरवठा न झाल्याने लसीकरण मोहीम थांबत असल्यचा गुरुवारी स्पष्ट केले. काही प्रणात लस होती. हा साठा संपल्यानंतर काल लसीकरण बंद होते. आता पुन्हा लसीकरणाचा साठा उपलब्ध झाल्याने आजपासून पुन्हा शहरातील लसीकरण अभियान पुन्हा सुरु होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे.

दरम्यान, कांदिवली येथील बोगस लसीकरणावरुन मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार फटकारले होते. त्यावेळी यापुढे बनावट लसीकरण होणार नाही, अशी हमी मुंबई महापालिकेने दिली आहे. त्यानंतर महापालिकेकडून काळजी घेतली   जात आहे. खासगी गृहनिर्माण संस्था, कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि इतर जागांवर बनावट लसीकरण शिबिर रोखण्यासाठी मसुदा मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्याची माहिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात मुंबई महानगरपालिकेने दिली.

मुंबई पालिकेने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता, जे संशयास्पद परिस्थितीत त्यांच्या प्रभाग युद्ध कक्षाशी संपर्क साधतील आणि अशा ठिकाणी कोरोनाव्हायरस प्रतिबंधक लसीकरण देखरेखीची जबाबदारी घेतील.

दरम्यान, महानगरपालिकेने असेही निदर्शनास आणले आहे की शहरात एकूण  54,67,805  नागरिकांचा रोगप्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. 10,83,266 हून अधिक लाभार्थ्यांना त्यांच्या COVID-19 लशीचा दुसरा डोस मिळाला आहे. शहरात सध्या कार्यरत असलेल्या 399 COVID-19 लसीकरण केंद्रांपैकी 281 नागरी संस्था चालवित आहेत, तर 98  केंद्रे खासगी आणि 20 शासकीय संचालित आहेत.