Weekend Lockdown मधून या लोकांना सूट, मुंबई महापालिकेचा निर्णय

शनिवारी आणि रविवारी या लोकांना ही कामासाठी बाहेर जाता येणार...

Updated: Apr 7, 2021, 07:15 PM IST
Weekend Lockdown मधून या लोकांना सूट, मुंबई महापालिकेचा निर्णय title=

दीपक भातुसे, मुंबई : राज्यात 30 एप्रिलपर्यंत विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री 8 पासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊनचे नियम पाळावे लागणार आहेत. शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊऩ असणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच घराबाहेर पडता येणार आहे. 

राज्यात दिवसा संचारबंदी आणि रात्री कर्फ्यू लागू असल्याने रात्री 8 नंतर कोणालाही विनाकारण घराबाहेर बाहेर पडता येणार नाहीये. पण आता मुंबई महापालिकेने यामध्ये आणखी काही व्यक्तींना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत विकेंड लॉकडाऊन दरम्यान परीक्षार्थी विद्यार्थी, घर कामगार, वाहन चालक, ज्येष्ठ नागरीकांची काळजी घेणारे तसेच होम डिलिव्हरी सेवा देणाऱ्या व्यक्तींना वगळण्यात आलं आहे.

-वेगवेगळ्या परिक्षा आणि स्पर्धा परिक्षांना जाण्यासाठी विकेन्ड लॉकडाऊन दरम्यानही विद्यार्थ्यांना परवानगी असेल...त्यांच्यासोबत जाणा-या एका व्यक्तीस/पालकास परवानगी असेल...याकरता विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट ग्राह्य धरले जाईल

-स्विगी, झोमॅटोसारख्या इ कॉमर्स कंपन्यांना आठवड्यातील सातही दिवस २४ तास होम डिलीव्हरी साठी परवानगी राहिल

-विकेन्ड लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना हॉटेलमध्ये जावून पार्सल घेता येणार नाही, ते डिलिव्हरी बॉयकडूनच मागवता येईल

-विकेन्ड लॉकडाऊनमध्ये अन्नपदार्थ आणि फळे विकणा-या फेरीवाल्यांना परवानगी असेल मात्र केवळ पार्सल सुविधा द्यावी लागेल, तिथं उभे राहून लोकांना खाता येणार नाही

-घरकाम करणा-या महिला,कूक, ड्रायव्हर, नर्स आणि ज्येष्ठ नागरिकांचे मदनीस यांना सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत संबंधित घरांमध्ये जाण्यास परवानगी 

-डोळ्यांचे दवाखाने आणि चष्मा दुकाने सरकारने निर्धारीत केलेल्या वेळेत सुरू राहतील

मुंबई महापालिकेने याबाबत नव्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे आता विकेंड लॉकडाऊन दरम्यान आणखी काही लोकांना सूट देण्यात आली आहे.

संबंधित बातमी : Curfew : रात्री 8 नंतर बाहेर पडायचे असेल तर या गोष्टी जवळ असणं आवश्यक