... तरच चेंबूर येथील बीपीसीएल कंपनीची आग आटोक्यात येईल?

 भारत पेट्रोलियमच्या कंपनीत स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागलीय. या आगीत २१ कर्मचारी जखमी झाले आहेत.

Updated: Aug 8, 2018, 05:22 PM IST
... तरच चेंबूर येथील बीपीसीएल कंपनीची आग आटोक्यात येईल? title=

मुंबई : मुंबईतल्या चेंबूरमधल्या भारत पेट्रोलियमच्या कंपनीत स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागलीय. या आगीत २१ कर्मचारी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.  दरम्यान, हाजड्रोडन आणि ऑक्सिजन संपत नाही तोपर्यंत आग सुरू राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली. आगीवर नियंत्रम मिळवण्यासाठी कुलिंगचं काम सुरु आहे.

बीपीसीएल हायड्रोजन प्लॉन्ट स्टॉकच्या ठिकाणी ही आग लागली. फोमद्वारे आग विझवाण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.  ज्या ठिकाणी प्लॉट आहे. त्या प्लान्टवरचे पत्र उडून ३०० मीटर दूर पडलेत. स्थानिककांच्या म्हणण्यानुसार गवाणपाडातील घरांना तडे गेले. काही एचपीसीएल कंपनच्या केबीनच्या काचा तुटल्या आहेत. यात अनेक कामगार जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

सुमारे तीनच्या सुमारास बीपीसीएल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे मोठी आग लागली. बीपीसीएल कंपनीचं अग्निशमन दल आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहे. मुंबई अग्निशमन दलाचेही २० फायर इंजिन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.