मुंबई : भाजपच्या ट्विटर हँडलवरुन आपल्याच सरकारवर टीका करण्यात आलीय. भाजपाच्या या ट्विटमध्ये make in maharashtra or fool in maharashtra असा उल्लेख आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर तात्काळ हे ट्विट डिलिट करण्यात आलं.
दरम्यान भाजपच्या ट्वीटर हँडलवरून कोणतंही ट्विट केलं गेलं नसतानाही सरकारविषयी आक्षेपार्ह ट्वीट प्रसिद्ध करण्यात आल्याचं भाजपनं म्हटलंय. याची पोलीस चौकशीची मागणीही भाजपनं केलीय.
मात्र विरोधकांनी या ट्विटचे स्क्रीन शॉट काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. या ट्विटचा आधार घेऊन विरोधकांनी भाजप सरकार विरोधात सोशल मीडियावर टीका करण्याची मोहीमच उघडली आहे.
राज्यात #makeinmaharashtra नव्हे, #foolinmaharashtra सुरू असल्याबाबत @BJPMaharashtra चा ट्वीट हीच वस्तुस्थिती आहे. मागील अडीच वर्ष आम्ही ही बाब निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करीत होतो. अखेर आता त्यांनाही वास्तविकता पटलेली दिसते.#मनी_वसे_ते_twitterवर_दिसे pic.twitter.com/qcxV8LvOUL
— R Vikhe Patil (@RVikhePatil) December 3, 2017