मुंबई : राज्यात सध्या महासभांचा धडाका सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी नंतर आता भारतीय जनता पक्षानेही भव्य सभा घेण्याचे आयोजन केले आहे. भाजप कार्यकर्त्यांना बुस्टर देण्यासाठी तसेच शिवसेना आणि महाविकासआघाडीला डोस देण्यासाठी ही सभा असेल अशी माहिती भाजपनेते आशिष शेलार यांनी दिली आहे.
भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांची 1 मे रोजी मुंबईतील सोमय्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या राजकीय विषयांवर भूमिका मांडण्यासाठी भाजपने ही सभा आयोजित केली आहे.
फडणवीसांच्या तडाखेबंद भाषणाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्र अनुभवणार आहे. गेल्या काही दिवसात मेट्रो कारशेड प्रकल्पापासून ते अनेक घोटाळ्यापर्यंत अनेक मुद्यांवर देवेंद्र फडणवीस बोलणार आहेत. असे आशिष शेलार यांनी म्हटलंय.