Car Accident : धनंजय मुंडे, जयकुमार गोरे आणि... 15 दिवसांत 3 आमदारांच्या कारला अपघात

15 दिवसात तीन आमदार अपघातग्रस्त. भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात. 

Updated: Jan 7, 2023, 08:34 PM IST
Car Accident : धनंजय मुंडे, जयकुमार गोरे आणि... 15 दिवसांत 3 आमदारांच्या कारला अपघात title=

Car Accident : मागील 15 दिवसांत महाराष्ट्रातील तीन आमदारांच्या कारला अपघात झाला आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे(BJP MLA Jayakumar Gore), राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे(NCP MLA Dhananjay Munde) आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम(Shinde Group MLA Yogesh Kadam) यांच्या कारला अपघात झाला(Car Accident). या अपघतात तिन्ही आमदार जखमी झाले आहे. 14 ऑगस्ट 2022 रोजी शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायक मेटे(Vinayak Mete) यांचे कार अपघातात निधन झाले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा अपघातांंची मालिका पाहता आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला 24 डिसेंबरला अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार खोल नदीत कोसळली. या अपघातात गोरे गंभीर जखमी झाले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या कारला परळीत अपघात झाला. कार्यक्रम आटोपून घरी जात असताना रात्री मुंडेंचा अपघात झाला. या अपघातात मुंडे यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. धनंजय मुंडे यांना  एअर ॲम्बुलन्सने मुंबईत आणण्यात आले. ब्रिज कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  ड्रायव्हरचा कारवरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला अशी माहिती स्वत: धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली. 

शुक्रवारी  दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात झाला. डंपरने त्यांच्या कारला धडक दिली. यात कदम सुदैवानं बचावले आहेत. 15 दिवसात 3 आमदारांचे अपघात झाल्याने आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन

14 ऑगस्ट 2022 रोजी मराठा समाजाच्या बैठकीसाठी पुण्याहून मुंबईला येत असताना खोपोली बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या कारला अपघात झाला. अपघातात विनायक मेटे यांच्या डोक्याला जबर मार लगाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघातअत्यंत भीषण होता. अपघातात मेटे यांच्या कारचा चक्काचूर झाला. त्यांचे सहकारीही जखमी झाले होते. मात्र, मेटे यांच्या कुटुंबियांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा केला आहे. 

सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा 4 सप्टेंबर 2022 रोजी कार अपघातात मृत्यू झाला. मर्सिडीज बेंझ (Mercedes-Benz) जीएलसी 220 डी 4 मॅटिक कारने मिस्त्री मुंबईकडे येत असताना पालघरजवळ भीषण अपघात झाला. अपघाताआधी मिस्त्री यांच्या कारचा स्पीड 100 किमी प्रति तास होता. स्पीड कमी करताना हा अपघात झाल्याचे समजते.