मुंबई : भाजपच्या नेत्यांनी अन्वय नाईक कुटुंबाची भेट घ्यायला हवी. त्यांच्या वेदना समजून घ्यायला हवी असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलाय. यावेळी त्यांनी रिपब्लीक भारतचे संपादक अर्णव गोस्वामी आणि भाजप नेत्यांना टोला लगावलाय. आंदोलन करण हा भाजपचा अधिकार आहे. तो त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असू शकतो. पण त्यांनी नाईक कुटुंबाला भेटून त्यांच्या भावना समजून घ्याव्या असे ते म्हणाले.
अर्णब गोस्वामी हे भाजपाचे कार्यकर्ते आहे. त्यांचे चॅनल हे पक्षाचा लाऊडस्पीकर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यासाठी सर्व भाजप नेते उतरले. गोस्वामींवर केलेली कारवाई पत्रकार म्हणून नाही. रिया चक्रवर्तीच्याबाबतीत भाजपची वेगळी भूमिका असते. आणि अन्वया नाईक यांच्याबाबतीत वेगळी असते. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात नोट नव्हती तरी प्रकरण पुढपर्यंत नेलं. याप्रकरणात सुसाईड नोट असून त्यात नावे देखील. आहेत. महाराष्ट्राचे पोलीस हे बाहुल्या नाहीत असे राऊत यांनी म्हटले.
अन्वय नाईक यांच्या घरी जाऊन जर भाजपवाल्यांनी त्यांना काय वाटतं ते समजून घ्यायला हवं असे राऊत म्हणाले. ंदोलन करण्याचा अधिकार त्यांना आहे. या देशात मानवता, सत्य, न्याय या शब्दाचा वापर कधी करु नये.
अर्णव यांच्यावरील हल्ला पत्रकार स्वत:वरचा हल्ला मानायला तयार नाहीत. कोणावरच अन्याय होणार नाही. आणि सत्याचा परायजय होणार नाही असे राऊत यावेळी म्हणाले.