ते आम्ही राज्य सरकारलाच देणार होतो, ब्रुक फार्मा रेमडेसीवीरप्रकरणी प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया

 भाजप नेते प्रसाद लाड यांची प्रतिक्रीया 

Updated: Apr 19, 2021, 02:33 PM IST
ते आम्ही राज्य सरकारलाच देणार होतो, ब्रुक फार्मा रेमडेसीवीरप्रकरणी प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया title=

मुंबई : ब्रुक फार्मा कंपनी रेमडेसीवीर साठाप्रकरणी आता भाजप नेते प्रसाद लाड यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. आम्ही 7 दिवसांपूर्वी दमणला गेलो होतो. ते आम्ही राज्य सरकारलाच देणार होतो, त्याचे पैसे फडणवीस देणार होते अशी माहिती लाड यांनी दिली. प्रविण दरेकर यांनी पत्र देखील लिहिलं. आम्ही सीताराम कुंटे यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली. सरकारने परवानगी दिलेल्या यादीत ब्रूक फर्मा या कंपनीच नाव असल्याचे स्पष्टीकरण लाड यांनी दिले. 

मुख्यमंत्री हे कट्टी बट्टीचा डाव खेळत आहेत. राजेंद्र शिंगणे यांचे ओएसडी ब्रूक फर्माला धमकी देतात. नवाब मलिक यांच डोकं बिथरल्याची टीका त्यांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर खंडणी प्रकरण सुरू आहे. फडणवीस यांच्यावर आरोप करणं म्हणजे आकाशावर थुंकण्यासारखं आहे. संजय राऊत हे रोज मीडिया समोर येऊन बोलतात, मुख्यमंत्री यांनी राऊतांना तेच काम दिल्याची टीका त्यांनी केलीय.

गृहमंत्र्यांचा इशारा 

ब्रुक फार्मा कंपनी मालकाच्या पोलीस चौकशी वादात गृहमंत्र्यांनी इशारा दिलाय. विरोधी पक्षनेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असं वळसे पाटलांनी म्हटलंय.

फडणवीसांचे उत्तर 

तर गृहमंत्र्यांच्या या इशाऱ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिलंय.महाराष्ट्राला जी व्यक्ती रेमडेसिवीर द्यायला तयार होती. केवळ विरोधकांनी आवाहन केलं म्हणून त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला नेण्यात आल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय.