सत्ता सोडावी का? : शिवसेनेत दोन गट, श्रेष्ठींवर दबाव

सत्तेतून बाहेर पडण्यावरून शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. ग्रामीण भागातील आमदारांचा सत्तेतून बाहेर न पडण्यासाठी शिवसेना श्रेष्ठींवर दबाव वाढत आहे.

Updated: Sep 23, 2017, 10:47 PM IST
सत्ता सोडावी का? : शिवसेनेत दोन गट,  श्रेष्ठींवर दबाव  title=

दीपक भातुसे, मुंबई : सत्तेतून बाहेर पडण्यावरून शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. ग्रामीण भागातील आमदारांचा सत्तेतून बाहेर न पडण्यासाठी शिवसेना श्रेष्ठींवर दबाव वाढत आहे.

आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये, ग्रामीण भागातील आमदारांचा दबाव वाढत आहे. सरकारविरोधात आंदोलन केल्यानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेवरून ग्रामीण भागातील आमदारांनी मातोश्रीवर निरोप पोहोचवलाय.

मुंबईतील काही आमदार आणि पदाधिकारी यांचा सरकारमधून बाहेर पडण्याचा आग्रह धरला आहे. मंत्रीमंडळ फेरबदलात शिवसेनेच्या जुन्या मंत्र्यांना वगळून नवीन लोकांना संधी देण्याची ग्रामीण भागातील आमदारांची मागणी आहे. सत्तेत राहून दोन वर्षांत ग्रामीण भागात शिवसेना वाढविण्यावर भर देण्याची ग्रामीण भागातील आमदारांची भूमिका आहे, अशी माहिती शिवसेनेनेतील सूत्रांनी दिलेय.