मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Assembly Constituency Bye Election) भाजपने (Bjp) कंबर कसली आहे. शिंदे गटाकडून (Eknath Shinde Group) ही जागा आपल्याकडे घेतल्यानंतर आता भाजपा निवडणूक प्रचारासाठी सज्ज झाला आहे. भाजपाकडून मुरजी पटेल (Murji Patel) हे रिंगणात उतरणार आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा निवडणूक प्रचार मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज भाजप मुंबई अध्यक्ष आणि अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे प्रभारी आशिष शेलार यांचे हस्ते करण्यात आले. भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यात कार्यालयाच्या जागेवरून 4 दिवसांपूर्वी राडा झाला होता. (bjp andheri east assembly constituency bye election candidate murji patel will win by 50 thousand votes says ashish shelar)
शिंदे गटाबरोबर युतीमध्ये अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आम्ही लढत आहोत. ही पोटनिवडणूक एकतर्फी होईल आणि किमान 50 हजार मताधिक्याने आमचा उमेदवार जिंकून येईल असा विश्वास भाजपा आमदार आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे 11 मे 2022 रोजी दुबईत हृदविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले होते.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना सहभागी होत आहे म्हणजे दोन दुबळ्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून फुगडी घालायचे ठरवले आहे. काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेना गर्दी करायला जाणार. तर उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी करायला काँग्रेस कार्यकर्ते जाणार. मुंबईतल्या शिववड्याला बिर्याणीचा मसाला लावत आहेत. यामध्ये मात्र राष्ट्रवादी बळकट होत आहे असा टोलाही आशिष शेलार यांनी यावेळी लगावला.
ज्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी खेळाची मैदान कुदळ-फावड्याने उखडवली. जे आजही मेळावा शिवाजी पार्कवर घेतात आणि शिवाजी पार्क वाचवतील की नाही अशी परिस्थिती आणली त्या पेंग्विन सेनेला शिंदे सेनेच्या मेळाव्याला विरोध करण्याचा अधिकार नाही अशी टीकाही आशिष शेलार यांनी यावेळी केली.