Aditya Thackeray : वरळी मतदारसंघाला सुरूंग, दसरा मेळाव्याआधी शिंदे गटाचा धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाला सुरुंग लावणं सुरुच ठेवलं आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे.

Updated: Oct 2, 2022, 01:03 PM IST
Aditya Thackeray :  वरळी मतदारसंघाला सुरूंग, दसरा मेळाव्याआधी शिंदे गटाचा धक्का title=
Aditya Thackeray Big shock and Eknath Shinde nmp

Aditya Thackeray: आताची महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणातील (politics) सर्वात मोठी बातमी...एककीकडे शिवसेना (Shiv Sena) दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करत आहेत. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाला सुरुंग लावणं सुरुच ठेवलं आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे.

आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) वरळी (Worli) मतदारसंघातून 500 कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले आहेत. वरळी कोळीवाड्यातून (Koliwada) जवळपास 500 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोळीबांधव वर्षा (Varsha Bungalow) या निवासस्थानी प्रवेश घेतला. 

शिंदे गटात एन्ट्री!

शिवसेनेचे पहिले आमदार दिवंगत वामनराव महाडीक यांच्या सुकन्या हेमांगी वामनराव महाडीक (Hemangi Vamanrao Mahadik) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का लागणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची सावली म्हणून ओळखले जाणारे थापा म्हणजे चंपासिंह थापा (champa singh thapa) यांनी देखील एकनाश शिंदे यांच्या गटात (Eknath Shinde group) प्रवेश केला होता.

शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava)

दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरु आहे. त्यासाठी दोन्ही गटाकडून तयारी केली जात आहेत यासाठी विविध संकल्पना राबवली जातेय. वरळीचे माजी नगरसेवक अरविंद भोसले (Arvind Bhosale) यांच्याकडून वेगळ्या पद्धतीने आयोजन करण्यात आलं आहे. 

मातोश्री (Matoshree) ते शिवाजी पार्कपर्यंत (Shivaji Park) विविध क्षेत्रातील लोक पायी चालत जाणार आहेत. यामध्ये भजनी मंडळी, वारकरी, रक्तदाते, डॉक्टर तसंच विदेशी नागरिक देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. दसरा मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं देखील आवाहन या माध्यमातून केल जाणार आहे. याची रंगीत तालीम आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानाच्या कलानगर सिग्नल येथे होत आहे.

पाहा व्हिडीओ (नोट - जाहिरातीनंतर व्हिडीओ दिसणार)