bihar assembly election results 2020 : बिहारमधील जनतेला अनुसरून आठवलेंची लक्षवेधी प्रतिक्रिया

बिहारमध्ये एनडीए आघाडीवर असल्याचं चित्र दिसून येत आहे.  

Updated: Nov 10, 2020, 07:15 PM IST
bihar assembly election results 2020 : बिहारमधील जनतेला अनुसरून आठवलेंची लक्षवेधी प्रतिक्रिया title=

मुंबई : बिहारमध्ये एनडीए आघाडीवर असल्याचं चित्र दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election Results) मतमोजणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. बिहारमध्ये एनडीए यशाच्या दिशेने कूच करताना दिसत आहे. त्यामुळे बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं दिसून येत आहे. अशात एनडीएला पुन्हा बहुमत दिल्याबद्दल बिहारच्या जनतेचे आभार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मानले आहेत. 

रामदास आठवले यांनी बिहारमधील जनतेला अनुसरून केलेली प्रतिक्रिया सध्या लक्षवेधी ठरत आहे. 'बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महागठबंधनने नितीशकुमार आणि एनडीएवर प्रचंड टीका केली. मात्र त्यांना बिहारच्या जनतेने नाकारले असून एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं असल्याचं आठवलेंनी सांगितले आहे. 

शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे सुशीलकुमार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी मेहनतीने प्रचार केला. बिहारच्या विकासासाठी जनतेने एनडीएला स्पष्ट बहुमत देऊन पुन्हा संधी दिल्याबद्दल बिहारच्या जनतेचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हार्दिक आभार मानले आहेत.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी ३ टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी ८ वाजता सुरू झाली. सुरुवातीच्या तासाभरात महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारली. मात्र, हे कल हळूहळू बदलत गेले. सध्या बिहारमध्ये एनडीए आघाडीवर असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष बिहारच्या निकालाकडे लागलं आहे.