Tripti Dimri : बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिचं खासगी आयुष्य तर कधी तिचे चित्रपट. तृप्ती यशाच्या शिखरावर आहे. अशात दिवसागणीक यशस्वी होणाऱ्या तृप्ती विरोधात सध्या असे काही आरोप लावण्यात आले आहेत ज्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. इतकंच नाही तर तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर आता तिच्या टीमनं सफाई देखील दिली आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल की नेमकं ही कशामुळे घडत आहे तर हे प्रकरण जयपुरच्या एका कार्यक्रमातील आहे. तिच्या पोस्टरवर काळ्या शाईने रेघोटे ओढण्यात आले आहेत. इतकंच नाही तर तिनं 5 लाख रुपये घेऊन कार्यक्रमात हजेरी लावली नाही त्यामुळे संताप देखील व्यक्त केला आहे.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर आता तृप्ती डिमरीच्या टीमकडून एक वक्तव्य समोर आलं आहे. 'आगामी चित्रपट 'विक्की विद्या का वो वाला व्हिडीयो' च्या प्रमोशन दरम्यान, तृप्तीनं तिच्या प्रोफेशनल कमिटमेंट्स आणि जबाबादाऱ्या योग्य पद्धतीनं पार पाडल्या आहेत. तिनं चित्रपट संबंधीत प्रोग्राम आणि सेशलमध्ये सहभाग घेतला. वरती लिहिलेल्या प्रमोशनल कमिटमेंटशिवाय तृप्तीनं कोणत्याही खासगी किंवा पर्सनल अपीयरेंस कार्यक्रमांमध्ये हजरे लावण्यासाठी कमिटमेंट दिली नव्हती. हे सांगणं गरजेचं आहे की या कार्यक्रमांमध्ये तृप्तीनं हजेरी लावावी यासाठी कोणतंही मानधन घेण्यात आलं नव्हतं.'
1 ऑक्टोबरला जयपुरच्या एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक महिला तृप्तीवर असलेला राग काढताना दिसते. तिच्या पोस्टवर ती काळ्या शाईने रेघोटे ओढताना दिसते आणि देखील बोलते की 'तिचा चेहरा काळा रंगानं रंगवा... ही कोणती मोठी सेलिब्रिटी आहे. हिला कोण ओळखतं.'
हेही वाचा : शक्तिमानची भूमिका मला साकारू द्या, 3 तास केल्या विनवण्या... मुकेश खन्नांचे फॅन्स म्हणतात, रणवीर नकोच!
तृप्तीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर 'विक्की विद्या का वो वाला व्हिडीयो' हा 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या व्यतिरिक्त ती कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया 3' मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय विद्या बालन आणि माधुरी दीक्षित देखील त्यात दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या निमित्तानं अर्थात 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तृप्ती ही सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'धडक 2' मध्ये दिसणार आहे.