मुंबई : बेस्ट संपाबाबत महापौर बंगल्यावर झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. 10 ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील, असं आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी दिलं आहे. मात्र लेखी आश्वासनाची मागणी कर्मचारी संघटनांनी लावून धरली आहे.
पालिका आयुक्तांवर आपला विश्वास नाही. आज मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर जाणार असल्याचं कामगार नेते शशांक राव यांनी जाहीर केलं आहे. शिवसेनेची कामगार संघटनाही संपात सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले. थकित वेतनासह अन्य मागण्यांसाठी संपावर जाण्याची घोषणा कर्मचारी संघटनांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महापौर बंगल्यावर कर्मचारी संघटनांची बैठक झाली. यावेळी बेस्टमध्ये असलेल्या अन्य समस्या टप्याटप्यानं सोडवण्यात येतील, असं आश्वासन महापौरांनी दिलं. मात्र कर्मचारी संघटनांचं यावर समाधान झालेलं नाही.