अर्थसंकल्पाआधी शेअर बाजाराला उधाण

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज प्रथमच ११ हजाराचा टप्पा ओलांडलाय.

Updated: Jan 25, 2018, 09:44 AM IST
अर्थसंकल्पाआधी शेअर बाजाराला उधाण title=

मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज प्रथमच ११ हजाराचा टप्पा ओलांडलाय.

सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात आलेल्या खरेदीच्या लाटेचा परिणाम म्हणून आज निफ्टीनं हा ऐतिहासिक स्तर ओलांडालाय.

येत्या अर्थसंकल्पाता कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपातीची शक्यता बघता ही खरेदी बघायला मिळतेय.

गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्समध्ये एक हजार अंकांची वाढ झालीय... तर निफ्टीला १० हजारावरून ११ हजाराची पातळी गाठायला ७५ सत्र लागलीय.

निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकांमध्ये जवळपास १० टक्क्कांची वाढ झालीय.