सावधान! तुम्हाला 'या' नावाचा मेल आलाय का? तुमचा डेटा जाऊ शकतो चोरीला

राज्य सायबर सेलनं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे

Updated: Oct 13, 2021, 08:28 PM IST
सावधान! तुम्हाला 'या' नावाचा मेल आलाय का? तुमचा डेटा जाऊ शकतो चोरीला title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : एका फ्रॉड ई मेलपासून आम्ही तुम्हाला सावध करतोय. तुमच्या ई-मेल आयडीवर एका विशिष्ट नावानं मेल आला असेल तर तो तुम्ही उघडू नका. कारण हा मेल तुम्ही ओपन केलात तर तुमचा डाटा चोरीला जाण्याची भीती आहे. पाकिस्तानी हॅकर्सचं हे नवीन जाळं आहे. तुमचा मेल इनबॉक्स चेक करा. त्यामध्ये राजेश शिवाजीराव नागवडे नावानं ई मेल आला असेल, तर जर थांबा. हा मेल अजिबात उघडून पाहू नका.

पाकिस्तानी हॅकर्सचा नवा ट्रॅप

पाकिस्तान आणि यूपीतील हॅकर्सनी ई-मेल हॅक करण्यासाठी हा ट्रॅप लावलाय. राजेश शिवाजीराव नागवडे ps.mummahapolice.gov या आयडीवरून त्यांनी सर्व शासकीय ई-मेल आयडीवर फिशिंग मेल डिलिव्हर केले आहेत. 'टेरेरिस्ट बिहाईंड जेके अटॅक गन डाऊन इन मुंबई' या विषयाचा फिशिंग ई-मेल राजेश शिवाजीराव नागवडे नावाच्या आयडीवरून डिलिव्हर होत आहे. 

मेलमध्ये रिपोर्ट इंटेलिजंट डॉट पीडीएफ नावाची एक पीडीएफ फाईल अटॅच करण्यात आली आहे.ती फाइल उघडल्यास आपला सगळा डेटा पाकिस्तानी हॅकर्सच्या ताब्यात जातो. राज्य सायबर सेलनं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.