दुसऱ्याच्या चुकीमुळे रिकामा होईल बँक बॅलन्स...

मुंबईच्या अंधेरी भागात सोसायटी स्टोअरच्या बाहेर लावलेली ही नोटीस पाहा...

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 11, 2017, 09:27 PM IST
दुसऱ्याच्या चुकीमुळे रिकामा होईल बँक बॅलन्स... title=

मुंबई : मुंबईच्या अंधेरी भागात सोसायटी स्टोअरच्या बाहेर लावलेली ही नोटीस पाहा. जागोजागी लिहीलंय सरोज खन्नांना शोधा आणि त्यांची माहिती द्या... या सरोज खन्नांनी 9 ऑक्टोबरला शॉपिंग केल्यावर रक्कम भरली 1 लाख अठरा हजार दोनशे रूपये...

पण प्रत्यक्षात त्यांचं बिल झालं होतं केवळ एक हजार एकशे ब्यायशी रूपये. स्टोअरच्या कर्मचा-याने चुकून एक लाख अठरा हजारांची रक्कम टाकली आणि खन्नांनीही पिन नंबर टाकून ती मान्य करून अदाही केली. संध्याकाळी हिशेब करताना स्टोअर मॅनेजरच्या लक्षात ही चूक आली आणि आता ते सरोज खन्नांना शोधत आहेत.